आरोग्य विभागाने लसीकरणावर भर द्यावा... कोण म्हणले वाचा....


पाथर्डी : कोरोनाच्या साथरोगाच्या दुसऱ्या लाटेत नगर जिल्ह्यासह पाथर्डी तालुक्यातही कोरोना बाधित रुग्ण मोठया संख्येने आढळून आले त्याचबरोबर मृत्युचे प्रमाणही वाढले.ग्रामीण भागात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने अरोग्य विभागाने लसीकरणावर भर द्यावा असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.

येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड बाबत आढावा बैठक आयोजीत करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी तहसीलदार शाम वाडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक कराळे, डॉ. मनीषा खेडकर,नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अजय रक्ताटे,अँड. प्रतीक खेडकर, नगरसेवक महेश बोरुडे, नामदेव लबडे उपस्थित होते.

डॉ. विखे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वतीने आजही राज्य व देशात ४५ पुढील वयाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. 

अनेक भागांत लसीकरण नियोजन प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत आहे. प्रशासनाच्या नियोजनास सगळ्यांनीच पूर्ण सहकार्य करण्याची गरज आहे. 

येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील जनतेला लसीचा किमान एक डोस मिळेल यासाठी पाठपुरावा केला जाईल कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी पर्याय आहे, असेही खासदार डॉ. सुजय विखे यावेळी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post