चांद्यात पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून


चांदा :  मागील भांडणाच्या कारणावरून तरूणाची काल रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान गावातील नदीजवळील भर चौकात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. यामुळे चांदा आणि परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

ज्ञानदेव उर्फ माऊली सोपान दहातोंडे (वय ४०) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत चांगदेव नारायण दहातोंडे (वय ५०, धंदा शेती रा.चांदा) यांनी  सोनई पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. 

त्यात म्हटले आहे, घोडेगाव ते कुकाणा रोड लगत  चांदा नदीचे पात्र जवळ मासे विक्री करत होतात. त्या ठिकाणी धनेश शिवाजी पुंड व त्याचे सोबतीचा आणखी एक अनोळखी साथीदार यांनी त्यांच्याकडील पल्सर मोटार सायकल वरून घेऊन मागे अडीच महिन्यापूर्वी फिर्यादीचे चांदा गावातील हॉटेल जवळील एका जणाला यातील आरोपी धनेश शिवाजी पुंड याने मारहाण केली. 

त्यात मयत ज्ञानदेव दहातोंडे व इतर काहींनी आरोपी धनेश शिवाजी पुंड याला मारहाण केली व त्यांच्यात वाद झाला होता. तो परस्पर आपसात मिटविण्यात आला होता. 

चांदा गावात आरोपीचा अपमान झाला म्हणून  धनेश शिवाजी पुंड यांनी हातातील धारदार शस्त्राने ज्ञानदेव उर्फ माऊली सोपान दहातोंडे (रा. चांदा ता. नेवासा) यांचे डोक्यात वार करून त्यास हात जखमी करून त्यात जीवे ठार मारले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनेची खबर मिळताच सोनई पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे मोठा फोजफाटा घेऊन चांदयात दाखल झाले काल रात्रीपासूनच गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

श्रीरामपूर उपविभागीय अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. दीपाली काळे शेवगाव विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे हेही घटनास्थळी हजर झाले होते. 

दरम्यान घटनेचा रितसर पंचनामा करण्यात आला असून पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटिल, शेवगाव विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे , श्रीरामपूर विभागीय अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या सूचना व मागदर्शनाखाली सोनई पोलिस ठाण्याचे सपोनी रामचंद्र कर्पे स्वतः या घटनेचा तपास करत आहेत. 

हे कॉ दत्तात्रय गावडे सहाय्यक फौजदार  संजय चव्हाण , पोलिस नाईक शिवाजी माने , हे कॉ विठ्ठल थोरात , हे कॉ .बाबा वाघमोडे आदीसह मोठा पोलिस बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला होता.

सोनई पोलिसात या घटनेचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post