माझा विकास निधी घ्या.... पण नागरिकांना लस द्या... नगरसेवक गणेश कवडे


नगर : गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे अनेकांचे बळी गेले आहेत, तर अनेकांना हॉस्पिटलचा मोठा खर्च सहन करावा लागला आहे. कोरोनावर प्रभावी ठरणारी लस सरकार नागरिकांना देत आहेत. परंतु लसीच्या तुटी अभावी सर्वांना ती मिळत नाही. तेव्हा मााझ्या नगरसेवक स्वेच्छा निधीची रक्कम लस खरेदीसाठी वापरुन नागरिकांना उपलब्ध करुन द्यावी, अशा आशयाचे निवेदन नगरसेवक गणेश कवडे यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना दिले. 

महापालिका आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, नगर शहर व उपनगरांमध्ये सध्या महापालिकेचे  सात प्राथमिक आरोग्य केंद्र व काही उपकेंद्र आहेत. 

प्रत्येक केंद्रावर लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला सकाळीच  लवकर येत  असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. परंतु लसीचा अपुरा  पुरवठा  होत असल्याने नागरिकांना विनाकारण दररोज हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे  त्यांचा वेळ व पैसा दोन्हीचा अपव्यय होत आहे.

आता खाजगी हॉस्पिटलवाल्यानी  पुणे येथील सिरम कंपनीशी थेट संपर्क साधून लस विकत घेत आहेत. शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी व कोरोनाचे उच्चाटन  करण्यासाठी मनपाने स्वत: लस खरेदी करावी. 

त्यासाठी माझ्या नगरसेवक स्वेच्छानिधीची सुमारे आठ लाख रक्कम वापरण्यात यावी. त्या रकमेतून सिरम कंपनीची लस खरेदी करुन ती  नागरिकांना दिल्यास मोठा दिलासा  मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी नगरसेवक शाम  नळकांडे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post