अमर छत्तीसे
श्रीगोंदा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायती गैरव्यवहाराची तक्रार दाखल झाल्यामुळे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी या ग्रामपंचायतच्या कामकाजाची चौकशी लावली होती. त्यामुळे यांना आज नाहाटा यांनी कार्यालयात जाऊन धक्काबुक्की व शिवीगाळ केली आहे.
दरम्यान गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब नाहाटा यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
श्रीगोंदा पोलिसांनी नाहाटा यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला नगरहून अधिकारी श्रीगोंद्यात दाखल झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर या अधिकार्यांनी श्रीगोंदे शहर सोडले.
बीडीओंवर दबाव ?
या घडलेल्या प्रकाराबाबत गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी गुन्हा दाखल करू नये म्हणून त्यांच्यावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु प्रशासनाने ठाम भूमिका घेतली. त्यामुळे हा गुन्हा दाखल झाल्याची चर्चा सुरु आहे.

Post a Comment