विवाहितेचा छळ.. पती विरोधात गुन्हा...


राहुरी : कर्ज फेडण्यासाठी पत्नीने माहेरहून एक लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी राहुरी शहरातील विवाहितेला शिविगाळ करत मारहाण क्ल्या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगिता सोपान हारदे या विवाहित महिलेने  दिलेल्या फिर्यादीवरून पती सोपान एकनाथ हारदे याच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हारदे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले,  सुमारे दीड महिन्यापासून पती सोपान हारदे याने त्याच्यावर झालेले कर्ज मिटविण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये, अशी वारंवार मागणी केली. 

त्यासाठी वेळोवेळी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने तसेच सांडशीने डोक्यात मारहाण केली. या मारहाणीत करून जिवे मारुन टाकीन, अशी धमकी दिली. या मारहाणीत डोक्याला जखमही झालेली आहे.

संगिता हारदे यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी सोपान हारदे याच्या विरोधात पैशाची मागणी करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post