नगर : महापालिकेची निवडणूक सदैव या ना त्या कारणाने चर्चेत राहिलेली आहे. काल (मंगळवारी) झालेली निवड प्रक्रियेतही वादंग झालेले आहे. विशेष म्हणजे एकाच गटात हे वादंग झालेले असून एकमेकांवर पैसे घेतल्याचा आरोपही झाला आहे. हा शाब्दिक वाद धक्काबुक्कीपर्यंत गेल्याने अखेर तो पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
महापौर निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. यामध्ये महापौरपगासाठी शिवसेनेकडून रोहिणी शेंडगे व उपमहपौर पदासाठी राष्ट्रवादीकडून गणेश भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. या निवडणुकीत दोन्ही पदासाठी एक-एकच अर्ज आल्याने फक्त औपचारिकता बाकी आहे.
या निवडीच्या प्रक्रियेवरून एकाच गटात वाद झाले. सुरवातीला स्थानिकांमध्ये हा वाद शाब्दिक सुरु होता. त्यानंतर शाब्दिक वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहचला. विशेष म्हणजे पक्षाच्या एका नेत्यालाही यामध्ये धक्काबुक्की करण्यात आली.
या प्रकरणी एका गटाने पोलिस ठाणे गाठून याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. मात्र गुन्हा दाखल करण्यावर मारहाण झालेला गट ठाम होता.
ही घटना सुरवातीला शाब्दिक वादातून झालेली असून मुंबई वरून आलेल्या त्या नेत्यावर पैसे घेतल्याचा आरोपही करण्यात आल्याची चर्चा पोलिस ठाण्यात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु होती.
Post a Comment