सोहेल अख्तर सय्यद (रा. मुकुंदनगर, नगर) असे आरोपीचे नाव आहे. एप्रिल 2021 ते जून 2021 या काळात ही घटना घडली. पीडित युवती व आरोपी हे दोघेही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते.
आरोपीने युवतीचा मोबाईल नंबर मिळवून तिच्याशी मैत्री केली. मैत्रीचा फायदा घेत युवतीबरोबर छायाचित्र काढले. त्यानंतर एका लॉजवर नेऊन बळजबरीने गोळी खाऊ घालून अत्याचार केला.
त्यानंतर बदनामीची धमकी देत आरोपीने युवतीकडून सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतर पुन्हा एकदा बदनामीची धमकी देऊन पुन्हा बळजबरीने अत्याचार केला.
यापुढेही संबंध कायम ठेव अन्यथा बदनामी करेल , अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात सोहेल अख्तर सय्यद (रा. मुकुंदनगर, नगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment