जिवाची पर्वा न करता आरोग्य यंत्रणेकडून रुग्णांवर उपचार... आमदार मोनिका राजळे यांचे प्रतिपादन...


पाथर्डी : दीड वर्षापूर्वी अचानक आलेल्या कोरोना साथ रोगाने देशासह राज्यभरातील आरोग्य यंत्रणेवर सुविधा अभावी मोठा ताण पडला. सर्वच जण भयभीत झाले. मात्र आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सामोरे जाऊन रुग्णांवर उपचार केले, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

आमदार मोनिका राजळे यांच्या स्थानिक विकास निधीतून १७ लाख रुपये किंमतीची सुसज्ज रुग्णवाहिका व युवान फाउंडेशनचे संस्थापक संदीप कुसळकर यांच्या वतीने सात लाख रुपये किंमीतीचे व्हेंटीलेटर उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आले. त्याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयात आयोजीत लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

यावेळी अशोक चोरमले, उत्तम गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक कराळे, डॉ. मनिषा खेडकर, पंचायत समितीचे उपसभापती रविंद्र वायकर, विष्णुपंत अकोलकर, सुनिल ओव्हळ, नगरसेवक मंगल कोकाटे, बजरंग घोडके, नामदेव लबडे, डॉ. रमेश हंडाळ, अनिल बोरुडे, बबन बुचकुल, बंडू बोरुडे, अँड. प्रतिक खेडकर, ज्योती मंत्री, सचिन वायकर, भगवान साठे, राजू गुगळे, सोनू सारूक, जमीर आतार, नवनाथ नरोटे, सचिन पालवे, आदिनाथ धायतडक आदी यावेळी उपस्थित होते.

आमदार राजळे म्हणाल्या की यापुढील काळात येथील उपजिल्हा रुग्णालयात अधुनिक व दर्जेदार सुविधा तसेच मनुष्यबळ वाढवुन नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गेल्या वर्षी अचानक कोरोनाची साथ आली आपली आरोग्य यंत्रणा तोकडी पडली.

आरोग्य साहित्याच्या मर्यादा आल्या. त्यामुळे गेल्या वर्षी आमदार निधीतून उपजिल्हा रुग्णालयाला पंचवीस लाखाचे आरोग्य साहित्य दिले. यावर्षी सुसज्ज रुग्णवाहिका देण्यात आली.

जिल्हा नियोजन समिती मधून ५० बेडचे काम सध्या सुरू असून अजून ५० बेड वाढविण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. ऑक्सिजन प्लांटचे काम प्रगतीपथावर आहे. लवकर कार्यान्वीत होणार असुन शासकीय रुग्णालयासह शहरातील खाजगी रुग्णालयाची गरज भागणार आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा वाढून नागरिकांना चांगले उपचार येथेच मिळतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी युवान फाऊंडेशनचे संस्थापक संदीप कुसळकर म्हणाले की, माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या कार्याचा वारसा आमदार मोनिका राजळे समर्थपणे पुढे नेत आहे. 

कोरोना काळामध्ये रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यासाठीचे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून आमदार राजळे यांच्या कार्याचा गौरव केला.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक कराळे यांनी प्रास्ताविक तर सुरेश बाबर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मनीषा खेडकर यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post