नेवासा : तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील संकेत भानुदास चव्हाण यांच्यावर मंगळवारी रात्री गोळीबार झाला. या गोळीबारात चव्हाण गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
संकेत चव्हाण हे कांगोणी फाट्यावरून बऱ्हाणपूर रस्त्याने रात्री साडेनऊच्या दरम्यान आपल्या घरी येत असताना एका ठिकाणी लघुशंकेसाठी थांबले होते. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या इसमांनी गावठी कट्टयातून संकेत यांच्यावर गोळीबार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.
चांद्यात खूनाची घटना मागील पंधरवड्यात घडलेली आहे. त्या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच आता बर्हाणपूरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे.
या गोळीबारातील जखमी व गोळीबार करणारे मित्र असून त्यांच्यातील वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
Post a Comment