नेवासा : खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळाही उतरल्या असून वेगवेगळे उपक्रम राबवून शाळांमधील गुणवत्तेचा टक्का वाढविला जात आहे. त्याबरोबरच शाळांचा पट वाढण्यासाठी शिक्षकांचे सदैव प्रयत्न सुरु असतात. सध्या प्रवरासंगम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनोख्या पद्धतीने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. त्याची जिल्ह्यात सध्या चर्चा सुरु आहे.
येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी माझी शाळा मराठी शाळा, सारे शिकूया पुढे जाऊया, माझी शाळा.. माझे कुटुंब.. माझी जबाबदारी या आशयाचा एक सेल्फी पॉईंट बनवला.
हा सेल्फी पॉईंट प्रबोधनाबरोबरच विद्यार्थ्यांचे आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला आहे. या सेल्फी पॉईंटमुळे विद्यार्थी शाळेकडे आकर्षित होण्यास व जनजागृतीस मदत होत आहे. या सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांनी आपले छायाचित्र काढले आहे. पहिलीचा प्रवेश झाल्यानंतर मलाही पण सेल्फी पॉईंटवर फोटो काढायचा असा हट्ट चिमुकले धरून पालकांकडूनही हट्ट पूर्ण करून घेत होते.
इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवरासंगम गावच्या सरपंच अर्चना सुडके व उपसरपंच सोनाली गाडेकर यांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले. रंगीबेरंगी फुगे पाहून बालमने प्रफुल्लित झाली होती.
प्रवरासंगम शाळेतील शिक्षकांनी राबविलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची जिल्हाभर चर्चा सुरु आहे. शिक्षकांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. असेच काहीसे उपक्रम जिल्ह्यातील इतरही शाळांमध्ये राबविण्यात आलेले आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांनी आता कात टाकली असून गुणवत्तेबरोबरच शाळांचा पटही वाढलेला आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात शिक्षकांनाही संख्या वाढणार आहे.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर पालन शिक्षकांनी शाळेत केले.
शाळेत विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात आलेले नव्हते. परंतु मुलांच्या प्रवेशासाठी पालक शाळेत येत होते. त्यांच्याबरोबर मुले शाळेत येत होती. परंतु यावेळी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन केले जात होते. समाज प्रबोधनासाठी केलेले सेल्फीपाँईंट आकर्षण ठरत होते..
Post a Comment