जामखेड : उत्तमचंद गुगळे यांच्या स्मरणार्थ जामखेड शहरातील जैन श्रावक संघाचे जुने जैनस्थानकासाठी दोन मजली इमारत बांधून देणार आहे, अशी घोषणा येथील प्रसिद्ध कापड व्यवसाईक शांतीलाल गुगळे यांनी केली.
जामखेडच्या वैभवात भर व जैन समाजाला प्रेरणादायी ठरेल असे काम आहे. या कामामुळे शांतीलाल गुगळे व त्यांच्या परिवारांचा जैन श्रावक संघाच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
आपल्या दानशूर प्रवृतीसाठी नेहमीच तत्पर असलेले दानशूर शांतीलाल गुगळे यांनी जुन्या जैन स्थानकाच्या मालकीची पाच वर्षापासून मोकळी पडलेली जागा व त्याची समाजासाठी असलेली गरज ओळखली.
त्या जागेवर जैन समाजासाठी काहीतरी उपयोग व्हावा. असे वाटल्याने त्यांनी त्यांची दोन्ही मुले आनंद व जितेंद्र यांचा विचार घेऊन याठिकाणी उत्तमचंदजी गुगळे यांच्या स्मरणार्थ दोन मजली इमारत बांधून देण्याचा निर्णय घेतला.
रविवारी (ता. 27) ला जैन श्रावक संघाचे संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, सेक्रेटरी दिलीप गुगळे,. पदाधिकारी संजय कोठारी, आसराज बोथरा, प्रशांत बोरा, अभय गांधी, संदीप बोगावत आदींच्या उपस्थितीत दोन मजले पूर्णपणे बांधून देण्याचे सर्वांसमक्ष जाहिर केले.
शांतीलाल गुगळे म्हणाले की, ही इमारत आई-वडिलांच्या ऋणांचं उत्तरदायित्व म्हणून त्यांचा स्मरणार्थ बांधून देण्याच्या विचारातून मी हा निर्णय घेतला आहे.
संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी म्हणाले की, हे काम करून तुम्ही खूप मोठे सत्कार्य करत आहात. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्ही समक्ष उभा राहून काम करून घेऊ.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले की, काकांनी आम्हाला पहिल्या मजल्यावर भोजन व्यवस्था आणि दुसऱ्या मजल्यावर अतिथी भवन बांधून देतो असे जाहीर केले आहे.
यामुळे जामखेडच्या वैभवात भर तर पडणारच आहे. त्याबरोबरच जैन समाजाच्या साधूसंतांच्या दर्शनासाठी आलेल्या लोकांची व्यवस्था होईल. यावेळी या वास्तूतून गोरगरिबांना आणि गरजूंना अल्पदरात भोजन द्यावे, असे यावेळी ठरले आहे.
आसराज बोथरा म्हणाले की, शांतीलाल गुगळे यांनी दिलेल्या शब्दाला समाज कायम ऋणी राहील.
Post a Comment