नगर : काेराेना महामारी सुरु झाल्यापासून दिवस-रात्र आराेग्य विभाग राबत आहे. त्यामुळे पहिली व दुसरी साथ आटाेक्यात आलेली असून तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केल्याने नव्या जाेमाने आता पुन्हा आराेग्य कर्मचारी सज्ज झालेले आहेत. काेराेनाच्या काळात दैनंदिन लसीकरण व इतरत्र कामांबराेबर आता आराेग्य विभागातील कर्मचार्यांना लसीकरण, काेराेना तपासणी आदी कामे करावी लागत आहे. ही कामे करताना आम्हाला आमच्या घराची आठवणही येत नाही. आली तरी तिला विसरून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडत असताे. हे करताना मात्र काेणी आमच्या कामाचे काैतुक करीत नाही. परंतु छाेटीशी चूक झाल्यानंतर तिचा गावभर बाेभाटा झाल्याशिवाय राहत नाही. आम्हीही माणसे आहाेत, आम्हालाही भावना आहे.. हे आेळखून वागा, अशी म्हणण्याची वेळ आता आराेग्य कर्मचाऱ्यांवर आलेली आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यापासून काेराेनाने शिरकाव केलेला आहे. तेव्हापासून आराेग्य विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱी जनतेच्या सेवेसाठी सज्ज झालेले असून अद्यापही ते सज्ज आहेत. या कार्यकाळात आराेग्य कर्मचाऱ्यांना घरातील लग्न, उत्सव आदी कार्यक्रमांमध्ये सहभागी हाेता आलेले नाही. विशेष म्हणजे काहींना आपले वाढदिवस असूनही ते साजरे करता आलेले नाहीत.
आराेग्यसेवेचे घेतलेल्या व्रताला डाग न लागू देता सर्वच कर्मचारी दिवस-रात्र जनतेची सेवा करीत आहेत. हे करत असताना अनेकांना काेराेनाची बाधा झालेली आहे. त्यातून बरे हाेऊन पुन्हा हे कर्मचारी जनतेची आराेग्य सेवा करीत आहेत. काहीजणांचा काेराेनाने मृत्यूही झालेला आहे. असे असतानाही आराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून कामकाज सुरु आहे.
हे कामकाज करताना गेल्या वर्षापासून आराेग्य कर्मचाऱ्यांना स्वतःच्या कुटुंबासह नातलगाच्या आनंद साेहळ्यात सहभागी हाेता आलेले नाही. काहींना तर ड्युटी असल्यामुळे स्वतःचा वाढदिवसही घरच्यांबराेबर साजरा करता आलेला नाही.तरीही विना तक्रार आराेग्य कर्मचाऱ्यांचे कामकाज अविरतपणे सुरु आहे.
माेठे त्याग करूनही ना कर्मचाऱ्यांच्या पाठिवर अद्याप काेणी थाप मारलेली नाही. परंतु चूक झाल्यानंतर त्याचा गावभर बाेभाटा करायला अनेकजण पुढे येत आहे. हे प्रकार थांबणे गरजेचे आहे. त्यासाठी आता समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. चुकले तर समजून सांगणे गरजेचे आहे. तसेच चूक का झाली याचे कारणे शाेधूनच त्यावर आवाज उठविणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त हाेत आहे.
समाजातील काहींकडून नेहमीच हाेणाऱ्या त्रासाला आता आराेग्य कर्मचारी वैतागले आहेत. आम्हीही माणसे आहाेत... आम्हालाही भावना आहेत.. आम्हालाही मन आहे... आम्हालाही तुमच्या सारखाच आनंदाचा क्षणात सहभागी व्हायचे... आमच्या कुटुंबाला आम्हाला वेळ द्यायचा आहे.. आम्हालाही सुटी हवी आहे.. असे म्हणू लागलेले आहेत.
सर आरोग्य खात्याची फार चांगली माहिती दिली आहे. सर आतील परिस्थिती वेगळी आसते मानुस वाचवण्यासाठी धरपड चाललेली असते.. माणसे निघून जातांना आम्ही कोलमडतो. वाईट वाटते. पुनश्च पहिल्या पासून सुरवात करतात. सर आम्हाला वाटते हा हॉल (ward)कायमचा रिकामा रहावा. .
ReplyDeletePost a Comment