वडनेर ः पारनेर तालुक्यातील वडनेर येथील आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे भाळवणी येथे चालू असलेल्या शरदचंद्र पवार कोविड सेंटरला अंडी वाटप करण्यात आली.
यावेळी आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते ही अंडी कोविड
सेंटरला देण्यात आली. सामाजिक कार्यात नेहमीच वडनेर प्रतिष्ठानच्या सर्वच
सहकाऱ्यांचे मोठे योगदान असते. भाळवणी येथील कोविड सेंटरला वडनेरकर आर्थिक
मदत, औषध वाटप, फळे वाटप, अंडी वाटप या बाबी टप्प्याटप्प्याने करत आहेत.
कोराेना विरुद्धच्या या लढाईत नीलेश लंके प्रतिष्ठान वडनेरच्या सदस्यांचे
सातत्याने कोविड रुग्णांना मदतीचे कार्य चालूच आहे. आमदार नीलेश लंके यांचा
आदर्श व कार्याने राज्यभरातून मोठ्या संख्येने तरुण प्रेरित झालेले आहेत.
तालुक्यातील तरुणही मोठ्या प्रमाणात आमदार लंके यांच्या कार्याचा आदर्श
डोळ्यासमोर ठेवून सेवाभाव जपत आहेत.
आमदार लंके यांच्या सेवाभावी वृत्तीचा
आदर्श जपत आम्ही हे काम करत आहोत, असे मत प्रतिष्ठानच्या सदस्यांनी
व्यक्त केले. आमदार नीलेश लंके यांनी वडनेर येथील प्रतिष्ठानच्या सर्व
सदस्यांचे देत असलेल्या योगदानाबद्दल विशेष कौतुक करून भविष्यातील
चांगल्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार नीलेश लंके प्रतिष्ठान
निघोज गण प्रमुख सुनील बाबर, वडनेर येथील नीलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष
ज्ञानेश्वर वाजे, उपाध्यक्ष लहू बोचरे, सचिव दत्तात्रय थोरात, खजिनदार गणेश
वाजे, कार्याध्यक्ष नारायण बोचरे, सह खजिनदार नामदेव जगदाळे, सहकार्याध्यक्ष
साहेबराव वाजे, चंद्रकांत वाजे, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान गोरडे, गोकुळ
वाजे, संतोष वाजे, कृष्णा वाजे, अमोल वाजे, संदीप वाजे, विकास बोचरे आदी उपस्थित होते.
Post a Comment