बनावट वाटाणा पकडला... सहा लाखाचा मुद्देमाल जप्त...


नगर : बनावट वाटणाणा घेऊन जाणारा ट्रक पकडण्यात आलेला आहे. या करावाईत एकूण सहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पारनेरमध्ये करण्यात आली आहे.

 बोगस वटाणा बियाणे विक्रीसाठी येणार असून कृषी विभाग व पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करत ट्रकमध्ये प्रती बग 40 किलोच्या एकूण बॅग संख्या 150 असा 6 लाखाचा  बनावट वटाण्याचे बियाणे जप्त केले आहे. 

या प्रकरणी पारनेर ठाण्यामध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  या घटनेबाबत किरण गुलाबराव गवय ( वय 45 म . रा . श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे.

बनावट बियाणे संदर्भामध्ये कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने काल वटाण्याचा बियाणांचा आला आहे. त्यामध्ये बनावट बियाणे असल्याचे माहिती पथकाला मिळाली होती. या प्रकरणात या ठिकाणी सापळा रचून संबंधित चालकाच्या पण अधिक माहिती पोलिसांनी घेतली सदरचा ट्रक ( क्र.युपी 92 टी 8149 ) हा आंबेडकरचौक पारनेर येथे उभा होता. त्यात एकूण सहा टन वजनाचे बनावट वटाणा बियाणे आहे. 


याप्रकरणी ट्रक क्रमांक ( युपी 92 टी 8149 हीवरील चालक ( नाव पत्ता माहीत नाही ) पटेल सिडस कार्पोरेशन जालीन युपी या कंपनीचा मालक नाव पत्ता माहीत नाही . याच्याविरुद्ध भादवि कलम 420 सह बियाणे नियंत्रण आदेश 1983 खंड 3 ( 1 ) जिवनावश्यक वस्तू कायदा 1955 मधील कलम 3 ( 2 ) व बियाणे अधिनीयम 1966 चे कलम 19,21 अन्वये नुसार पारनेर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post