राहुरी : यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाचे शीर्षक पर्यावरण संवर्धन असे आहे. कृषी शास्त्रज्ञ 365 दिवस माती, पाणी, किड, रोग या पर्यावरणाच्या घटकांबरोबर काम करतो व पर्यावरण पूरक संशोधन करतो. येत्या चार वर्षात आपण लोकसंख्येत चायनाला ही मागे टाकणार आहे. पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचून या वाढत्या लोकसंख्येला जास्तीत जास्त अन्नधान्य पुरविणे आपल्यासमोर आव्हान आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत जागतिक पर्यावरण दिन ऑनलाइन साजरा करण्यात आला. या वेळी अध्यक्षीय मारदर्शन करताना कुलगुरू डॉ.पी. जी. पाटील बोलत होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील प्राध्यापक, सूक्ष्मजीवशास्त्र आणि जैवविविधता फेलो, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ डॉ. श्याम बाजेकल यांनी येथील वाहन अनुसंधान तथा विकास संस्थेचे संचालक
इंजि. संगम सिन्हा ऑनलाइन उपस्थित होते.यावेळी अधिष्ठाता डॉ अशोक फरांदे, संचालक संशोधन व विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख, तसेच प्रकल्पाचे प्रमुख संशोधक आणि या कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. सुनील गोरंटीवार उपस्थित होते.
पाटील की, कृषी क्षेत्रात विविध क्रांती झाल्या मुळे देश अन्नधान्यत स्वयंपूर्ण झाला आहे. मागील वर्षी 310 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन झाले आहे. हे उत्पादन घेताना पर्यावरणावर प्रचंड ताण असतो. म्हणून सुंदर, हरित, आनंदायी पर्यावरणात अन्नधान्याचे उत्पादन घेणे हे पुढील आव्हान असणार आहे.
डॉ. श्याम बाजेकल म्हणाले निसर्गाने उत्पत्ती केलेल्या घटकांचे विघटन होते पण मानव निर्मित वस्तूंचे विघटन न होता पर्यावरणाला घातक ठरते.
याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे प्लास्टिक. पर्यावरणाचे सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे प्राणी, वृक्ष आणि सूक्ष्म जिवाणू . झाडे ही प्राणवायूची निर्मिती करतात आणि हवेचे व ध्वनीचे प्रदूषणाला आळा बसवतात.
प्राणी, कीटक हे झाडांचे परागीकरण करण्यासाठी कारणीभूत ठरतात व जैवसाखळी चे संवर्धन करतात. जिवाणू हे माती जिवंत ठेवण्यात मदत करतात.
आपल्याला जगण्यासाठी जे पाहिजे ते सर्व जसेकी अन्न, पाणी, निवारा, औषधे आदी पर्यावरण पुरवत म्हणून आपण पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे.
इंदिरा प्रकाश म्हणाल्या कृषी पर्यावरण पूरक पण आहे आणि घातक पण आहे आपण पर्यावरण पूरक शेती कडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
जंगलांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यालमुळे जैविक साखळी चे संवर्धन होते. पर्यावरणाची काळजी घेणे व संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे.
याप्रसंगी अधिष्ठाता डॉ.अशोक फरांदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. शरद गडाख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. गोरंटीवार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
या वेळी डॉ. पवन कुलवाल यांनी जक्तिक पर्यावरण दीनासंदर्भात माहिती दिली. आभार प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. एम.जी. शिंदे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. निलम कोंडविलकर यांनी केले.
या ऑनलाइन कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. सेवक ढेंगे, इंजि. मोहसीन तांबोळी यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment