दुधाला आधारभूत दर द्या...अखिल भारतीय क्रांतीसेनेची मागणी...


राहुरी : शेतकऱ्यांची आर्थिक चक्रव्यूहातून सुटका करण्यासाठी अखिल भारतीय क्रांतीसेनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन ई-मेल द्वारे सादर केले आहे.

या निवेदनात म्हटले केले आहे की, आज राज्यातील शेतकऱ्यांना मिळत असलेल्या दुध दरामुळे शेतकऱ्यांचे दुध उत्पादित करण्याचा खर्चही भागत नसताना मंत्रालयात झालेल्या बैठकीत काही संघटनांनी बैठकीत उसाप्रमाणे दुधासाठी किमान आधारभूत दर २५ रुपयांची मागणी केली आहे.

परंतु शेतकऱ्यांना दूध उत्पादन करण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता दूध उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत दर मिळण्यासाठी अजित पवार यांनी पशुसंवर्धन करून शेतकऱ्यांच्या दूध दराला किमान आधारभूत दर ठरवण्याचे साकडे घातले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी बाजारभावामुळे मेटाकुटीला आलेला आहे. शेतकर्यांचे पिके मातीमोल भावाने विक्री होत आहे. कुठलेही सरकार सत्तेत आले तरी शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. 

परंतु त्यांच्या प्रश्नांचे राजकारणापुरते भांडवल केले जाते. शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी नेहमीच आर्थिक अडचणी अडकलेला असतो. या कारणास्तव शेतकरी कृषी पंप वीज बील भरु शकत नाही अथवा स्वतः च्या आरोग्यासाठी खर्च करण्यास असमर्थ असतो.

कोरोना व इतर मोठे आजारात पैशांअभावी उपचार न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे घरे उद्ध्वस्त झाले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जिवाशी निगडित प्रश्न आहे. 

तो शेत जमीन मोजणीचा या प्रश्नापायी जमिनीच्या वादातून अनेक शेतकऱ्यांचे घरे उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे शासकीय स्तरावर शेतजमीन मोजणी करण्यात यावी.अजित पवार  आपण शेतकऱ्यांचे कैवारी आहात. आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे जाण आहे.

या चक्रव्यूहातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी आपण पुढाकार घेत वरील शेतकऱ्यांच्या मागण्याचा सहानुभुतीपूर्वक विचार करून तातडीने मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, शिक्षक प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे, पुणे विभाग प्रमुख जगताप, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रंगनाथ माने, प्रसिद्ध प्रमुख बाबासाहेब चेडे, कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, संघटक जालिंदर शेडगे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर, नवनाथ ढगे, युवक जिल्हाध्यक्ष युवराज सातपुते, शब्बीर शेख,बाळासाहेब भोर, राहुरी तालुका अध्यक्ष संदीप उंडे, शेखर पवार, अक्षय मांडगे, सोमनाथ वने, भाऊसाहेब पवार आदींनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post