राहाता : राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील चांगले वस्तीवर राहणारे शशिकांत श्रीधर चांगले (वय 60) व सिंधू शशिकांत चांगले (वय 55) या पती-पत्नीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्हा हादरला आहे.
शशिकांत चांगले व सिंधू चांगले हे दोघेही पती-पत्नी शेतकरी आहे. हे पती-पत्नी आपल्या मुलांना भेटून काल घरी आले.
सकाळी लवकर उठवून शेतात काम करण्यासाठी जाणारे पती-पत्नी आज का लवकर उठले नाही म्हणून शेजारच्यांनी घरी जाऊंन पहिले तर दोघेही रक्ताने भरलेले व त्यांच्या डोक्याजवळ पावडे रक्तानी भरलेले पहिल्या नंतर स्थानिकांनी राहाता पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे.
हत्या कोणत्या कारणांमुळे झाली. ही हत्या कोणी केली, याचा तपास पोलिसांनी तातडीने करून आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
Post a Comment