अहमदनगर: राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्यावर येत असून त्यांच्या दौर्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार पाच जूनला रोजी दुपारी साडेतीन वाजता पुण्याहून
अहमदनगर येथे आगमन हाेणार आहे. साडेचार वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे वेळ राखीव आहे. त्यानंतर सायंकाळी साडेचार ते साडेपाचपर्यंत कोरोना उपाययोजना, लसीकरणाबाबत सर्व संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची जिल्हा
आढावा बैठक घेणार आहेत. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात हाेणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता पत्रकार
परिषद घेणार आहेत. सायंकाळी सहा वाजता शासकीय
विश्रामगृह अहमदनगरकडे प्रयाण करणार आहे.
रविवारी सकाळी नऊ ते साडेदहा दरम्यान शिवस्वराज्य दिन निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर बचतगटासाठीच्या साईज्योती
अॅपचा शुभारंभ हाेणार आहे. जिल्हा परिषद कार्यालयात या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. सकाळी साडे दहा वाजता सकाळ
अॅग्रोवन मार्ट व्हीसीद्वारे उदघाटन हाेणार आहे. सकाळी अकरा वाजता अहमदनगरहून लोणंदमार्गे कागल, (जि. कोल्हापूर)कडे प्रयाण करणार आहेत.
Post a Comment