राहाता ः काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरु झालेले आहेत. राहाता बाजार समितीत आज (गुरुवारी) कांद्याचे लिलाव झाले. बुधवारच्या तुलनेत आज गुरुवारी कांद्याची आवक व भावात वाढ झालेली आहे.
हे वाचा ः आराेग्य कर्मचारी म्हणतात.. आम्हीही माणसंच आहाेत...आम्हालाही भावना आहेत...
राहाता बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. 10 हजार 818 कांदा गाेण्यांची आवक झालेली आहे. एक नंबर कांद्याला 2300 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. बुधवारच्या तुलनेत आज गुरुवारी कांद्याच्या भावात 100 रुपये क्विंटलने भाव जादा मिळाला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत हाेता.
हे वाचा ः पहिलं प्रेम..
बुधवारच्या तुलनेत गुरुवारी एक हजार 212 कांदा गाेण्यांची जादा आवक झालेली आहे. आवक वाढूनही कांद्याच्या भावात वाढ झाल्याने कांद्याला यंदाच्या वर्षी चांगला भाव सापडेल, अशी आशा शेतकर्यांना लागली आहे. मार्च महिन्यात 1200 ते 1500 रुपये प्रतिक्विंटल दरानेच कांद्याची विक्री केली जात हाेती.
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव
एक नंबर कांदा ः 1700ते 2300, दाेन नंबर कांदा ः 1150 ते 1650, तीन नंबर कांदा ः 500 ते 1100, गाेल्टी कांदा ः 1200 ते 1500, जाेड कांदा ः 300 ते 500.
Post a Comment