स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची वाटचाल सुरूच ठेऊ... खासदार डॉ. सुजय विखे यांचे प्रतिपादन...


पाथर्डी : स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे सामाजिक कार्य राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेला माहित आहे. एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व त्यांच्या नेतृत्वाची छाप सर्वच मोठ्या राजकारणी प्रमुख नेत्यांना होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने स्व. मुंडे यांच्या कार्याची दखल घेऊन आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने स्व. मुंडे यांच्या नावाने पोस्टल स्टँप प्रकाशित केले. हा स्व. मुंडे यांचा केंद्र सरकारने केलेला गौरव आहे. हा क्षण भाजपा कार्यकत्यासाठी अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरातील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कोरोना बाधित रुग्णांना चहा, नाष्टा,फळे, भोजन व सॅनिटायझर, मास्कचे वितरण करण्यात आले.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, नगरसेवक नामदेव लबडे, महेश बोरुडे, प्रसाद आव्हाड, रमेश हंडाळ, अँड. प्रतीक खेडकर, अजय रक्ताटे, प्रशांत शेळके, दत्ता सोनटक्के, संदीप काकडे, डॉ. आदित्य इधाटे, लहानू कोलते, भैय्या थोरात, अनिल हरेर, शहानवाज शेख आदी यावेळी उपस्थित होते.

विखे म्हणाले की, स्व. गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणा पेक्षा सामाजिक काम,दिन दलित गरजू लोकांसाठी अहोरात्र काम केले. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करून समाज सेवेचा वसा अविरत चालू ठेऊ. 

शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचे निकष पाळून स्व. मुंडे यांची सातवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. आमदार मोनिका राजळे यांच्या जनसंपर्क कायालयत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. 

भालगाव येथे भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या परिवर्तन प्रतिष्ठाणतर्फे तसेच मोहज देवढे येथील सोमेश्वर कोविड केअर सेंटरच्या आवारात वृक्षरोपण करून स्व. मुंडे यांना अभिवादन करण्यात आले.

खरवंडी कासार, टाकळीमानूर, अकोला,  कोरडगाव, माणिकदौंडी, तिसगाव या मोठया गावासह लहान गावातही स्व. मुंडेची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post