​वृक्षाबराेबरच संस्काराचे राेपन... निघाेजमधील उपक्रमाचे सर्वचस्थरात काैतुक


पारनेर ः
वृक्षाराेपन केले पाहिजे, असा संदेश अनेकजण भाषणातून व समाजमाध्यमातून देऊन जनजागृती करीत आहे. मात्र निघाेज येथील ज्येष्ठ पत्रकार दत्ता उनवणे यांनी वृक्षाराेपनाचा संदेश देताना संस्काराचे राेपन बालमनावर केलेले आहे. या संस्कार राेपन क्षणाचे छायाचित्र समाजमाध्यमावर व्हायरल झालेले असून त्याचे सर्वचस्थरातून काैतुक हाेत आहे. 
 
दत्ता उनवणे यांचा 16 मेला वाढदिवस झाला. त्यानंतर एक जूनला त्यांची नात स्वराजंली रोहन उनवणे हिचा वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने उनवणे यांचा पुतण्या जळगाव जिल्ह्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला 5555 रूपयांची देणगी दिली. तसेच गुप्तदान म्हणून कुणीतरी 1111 रूपयांची देणगी दिली.संदीप पाटील वराळ आराेग्य मंदिर काेविड सेंटरला देणगी दिल्याबद्दल देणगीदारांचा सत्कार करण्याची प्रथा सुरु आहे. त्यातच उनवणे यांच्या कुटुंबियाने देणगी दिल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. 
 
स्वरांजली व माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून निघाेजच्या सरपंच चित्राताई सचिन वराळ पाटील यांनी आम्हाला केशरी आंब्याचे रोप देऊन आजाेबा व नातीचा सत्कार केला. निघोज ग्रामपंचात व संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनतर्फे सन्मान साेहळा झाला.  सन्मान साेहळ्यात मिळालेले केशरी आंब्याचे राेपन करण्याचा निर्धार उनवणे यांनी केला. त्यांनी घराजवळील शेतीच्या बांधावर केशरी आंब्याचे रोप करण्यासाठी जागा निश्चित केली. 
 
या वृक्षाचे राेपन व संवर्धन करण्याची जबाबदारी त्यांनी संवर्धन करण्याची जबाबदारी त्यांनी नात शर्वरी राहुल उनवणे, स्वरांजली रोहन उनवणे, रेवा रोहन उनवणे व नातू शिवांश राहुल उनवणे यांच्यावर साेपविली. या नातवंडांच्या हस्तेच त्यांनी आंब्याच्या झाडाचे राेपन केले. त्याची जबाबदारी या मुलांवर साेपवून त्यांनी वृक्षसंवर्धनाची शिदाेरी लहानग्यांच्या हाती देऊन समाजासमाेर एक आदर्श उभा केला आहे.
 
या संदर्भातचे छायाचित्र सध्या समाजमाध्यमावर व्हायरल हाेत आहे. त्याचे सर्वचस्थरातून काैतुक हाेत आहे. मुलांवर लहानपणीच संस्कार केले तर ते पुढेही कायम राहतात, हेच यातून दिसून येत आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी सगळ्यांनी केल्यास निश्चितच त्याचे चांगले फळ दिसून येईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post