आमदार लंके यांचे प्रयत्नातून कान्हूर येथे ३३ लाखाच्या विकास कामांचा शुभारंभ


पारनेर : पारनेर-नगर विधान सभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे प्रयत्नातून पारनेर तालुक्यातील पाडळीतर्फे कान्हूर लाटे वस्ती ओढ्यावर  लाखाच्या दोन सीडी वर्क बांधणे व काळकूप येथील रक्कम १९ लाख ३० हजाराच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंभ मंगळवारी आमदार नीलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 

या प्रसंगी जितेश सरडे, बाबाजी तरटे, राहुल झावरे, राजू चौधरी, बापू शिर्के, विजय औटी, श्रीकांत चौरे, सुनिल कोकरे, गणेश सुंबे, अशोक घुले, अभय नांगरे, प्रवीण वारुळे, सरपंच भागा कदम, संभाजी नरसाळे, सरपंच ताराबाई दिनकर कदम, सुंदरदास कदम, पांडुरंग कदम मेजर, बाळासाहेब कदम, भाऊसाहेब खरमाळे, दादा शिंदे, अंबादास अडसूळ, मच्छिंद्र खरमाळे, बाळासाहेब अडसूळ, महेश सालके, सुनील अडसूळ, चिमाजी गायकवाड, राजेंद्र कदम, भानुदास कदम, बाळासाहेब कदम, विलास अडसूळ, पिराजी शिंदे, बापू कदम, विजय शिंदे, सुरेश काळे ग्रामपंचायत सदस्य संतोष सुबे, रावसाहेब शिणारे, रावसाहेब शिंदे, संदीप शिणारे, जयसिंग दावभट, जालिंदर सुंबे, अण्णाराम शिणारे, गणेश सुंबे, भिमाजी सुंबे, राजेंद्र सुंबे, योगेश दावभट, अविनाश शेळके, भाऊसाहेब मेजर,ठकाराम  शिणारे, अर्जुन सुंबे, अजय दावभट, राजू दावभट, राजाराम सुंबे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते. 

काळकूप येथील अडसूळ वस्ती रस्ता मुरुमीकरण करण्यासाठी तीन लाखाचा खर्च, गावंतर्गत पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेसाठी लाखाचा खर्च, जिल्हा परिषद शाळा शौचालय बांधकाम करण्यासाठी अडीच लाख, आर ओ प्लांटसाठी दोन लाख, स्टेट लाईटसाठी तीन लाख, खंडोबा मंदिर रस्ता मुरुमीकरणासाठी दोन लाख, बंगलवाडी ते काळकूप फाटा रस्ता मुरुमीकरणासाठी अडीच लाख, नदी खोलीकरणासाठी दोन लाख असा एकूण ३३ लाख ३० हजाराचा निधीच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात  आला.

या कामांमुळे परिसराच्या विकासात भर पडणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post