श्रीगोंदा : तालुक्यातील राजकीय दृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरुध्द अपात्रतेची कारवाईचा प्रस्ताव करू नये यासाठी सोमवारी (ता. 22) बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी पंचायत समिती कार्यालयात येऊन गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या प्रकरणी त्यांना न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे.
गटविकास अधिकार्यांना धक्काबुक्की व शिविगाळ प्रकरणी नाहाटा यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी नाहाटा यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्यामुळे न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
त्यानंतर त्यांनी जामीनसाठी अर्ज दाखल केसा होता. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला असून तीन महिने श्रीगोंदा शहरात येण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
Post a Comment