नगर ः कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले होते. तसा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेला आहे. मात्र जनावरांचे बाजार सुरु झालेले नव्हते. या प्रश्नी जिल्ह्यातील राहाता, नेवासा, कोपरगाव, श्रीगोंदा बाजार समित्यांनी जनावरांचे बाजार सुरु करण्यात यावे, यासाठी निवेदन दिलेले आहे. या निवेदनानुसार जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन जनावरांचे बाजार सुरु करण्याबाबत परवानगी द्यावी, असे पत्र दिलेले आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नसला तरी लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक केलेल्या होत्या. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे जिल्ह्यात करण्यात आलेले कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना शिथिलता देण्यात आलेली होती.
अवश्य वाचा एकदा ः जनावरांचा बाजार सुरु व्हायला मुहूर्त कधीचा..
त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरु झालेले होते. मात्र जनवरांचे बाजार सुरु करण्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे जनावरांचे बाजार सुरु करण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील राहाता, श्रीगोंदा, कोपरगाव, नेवासा बाजार समितीतर्फे जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती.
सध्या खरिप हंगामाच्या पेरण्या सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे जनावरांची मशागतीसाठी गरज पडत आहे. जनावरांचे बाजार बंद असल्याने शेतकर्यांचे नुकसान होत आहे. तसेच बाहेरील जिल्ह्यातून जादा दराने शेतकर्यांना मशागतीसाठी बैलांची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भूर्दंड बसत अाहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करत बाजर समित्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे बाजार सुरु करण्यात यावी, मागणी केलेली आहे.
अवश्य वाचा एकदा ः जनावरांचा बाजार सुरु व्हायला मुहूर्त कधीचा..
त्यानंतर जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जनावरांचे बाजार सुरु करण्यास हरकत नसून आपण परवानगी द्यावी, अशी विनंती केलेली आहे.
हे पत्र जिल्हा उपनिबंधकांनी आज (बुधवारी) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे. त्यामुळे आता याव काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकर्यांच्या प्रश्नावर तेजवार्ता वेबसाईटने जनावरांचा बाजार सुरु व्हायला मुहूर्त कधीचा.. या मथळ्याखाली सडेतोड लेख लिहिलेला होता. या लेखातून शेतकर्यांच्या व्यथा समाजासह प्रशासनासमोर मांडल्या होत्या. त्यानंतर जनावरांचा बाजार सुरु होणे किती गरजेचे आहे. हे स्पष्ट झाले.
दरम्यान, जनावरांचा बाजार सुरु होण्यासाठी बाजार समित्यांनी पुढाकार घेतला. मात्र इतर जिल्ह्यातील धूरंधर नेत्यांना अद्यापही त्याचा विसर पडलेला असल्याचे दिसून येत आहे. व्यापाऱ्यांचे व्यवहार सुरळीत सुरु व्हावे, यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना मात्र शेतकर्यांचा हा महत्वाचा प्रश्न न दिसल्याने शेतकर्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Post a Comment