नेवासा : शिक्षक हिताबरोबरच समाजहित जोपासणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या गुरूकूल मंडळाचे समाजाभिमूख कार्य वाखाणण्याजोगे असल्याचे गौरवोदगार नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे यांनी काढले.
प्राथमिक शिक्षकांच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व प्राथमिक शिक्षक गुरुकुल मंडळाने शिक्षकांकडून जमा झालेल्या देणगीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करून नुकतेच तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सभापती रावसाहेब कांगुणे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, गुरुकुल उच्चाधिकार चे अध्यक्ष नितीन काकडे, जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे, शिक्षक नेते संदीप जंगले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांनीही गुरुकुलच्या या उपक्रमाचे कौतुक करून सर्व शिक्षकांना महसूल प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन केले.
डॉ. अभिराज सूर्यवंशी म्हणाले की, शिक्षक लसीकरणाबाबत सकारात्मक विचार केला जाईल, प्रथमता कोरोना कामकाजाचे आदेश असणाऱ्या शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करण्याचा प्रयत्न केला जाईल.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष भांबरे, विक्रम गोसावी, किशोर जाधव, अमोल काळे, युवराज थोरात आदींनी परिश्रम घेतले. संतोष भांबरे यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप जंगले यांनी आभार मानले.
शिक्षक नेहमी महसूल व आरोग्य प्रशासनाला सहकार्य करत आहेत, यापुढे कोविड कामकाजाचे आदेश देण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करावे.
-भास्करराव नरसाळे, जिल्हाकार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अहमदनगर
शिक्षक हा ज्ञानदानाबरोबर इतर विधायक उपक्रमात योगदान देणारा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे, कोरोना महामारीत शिक्षकांनी प्रशासनाला सहकार्य करावे !*
रावसाहेब कांगुणे, सभापती, पंचायत समिती, नेवासा
Post a Comment