पारनेर : जगप्रसिद्ध रांजणखळगे हा जगातील एक नैसर्गिक चमत्कार असून हा नैसर्गिक ठेवा पाहून आपण आचर्यचकीत झाल्याची माहिती भारतीय टपाल खात्याच्या वरिष्ठ अधिकारी टपाल संचालक सिमरण कौर यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
कौर यांच्याकडे राज्यातील पाच जिल्ह्यातील टपाल खात्याचा कार्यभार आहे. यामध्ये पुणे विभागातील पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर, श्रीरामपूर हे पोस्टल विभाग येतात. कौर या पुणे येथे भारतीय टपाल सेवेत टपाल सेवा संचालक या वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. एक कामगार प्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांनी पोस्टाच्या ग्राहकवाढीसाठी ध्येयलक्ष प्राप्ती योजना राबवली होती.
कौर म्हणाल्या देश परदेशातील अनेक पर्यटनस्थळे आपण पाहिली.मात्र निसर्गाचा अनमोल ठेवा म्हणून जगप्रसिद्ध रांजणखळगे हे पर्यटनस्थळ आपल्याला भावले आहे. हा नैसर्गिक चमत्कार आपण ऐकून होतो पहाण्याची इच्छा होती. ती आज या ठिकाणी येऊन पुर्ण झाली आहे.तब्बल दिड तास जगप्रसिद्ध रांजणखळगे कसे असतात याचे आपण निरीक्षण केले.
हा अनमोल ठेवा जपण्यासाठी आणी सर्वाधिक सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्यास परदेशातील पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येउन याचा फायदा सरकारला व स्थानिक रोजगारीसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांच्या समवेत अधीक्षक डाकघर पुणे ग्रामीण आर पी घुमारे, सहाय्यक अधीक्षक डाकघर पुणे ग्रामीण विभाग एस बी भंडारी हे उपस्थित होते.
यावेळी निघोज टपाल खात्यातील सबपोस्टमास्तर अरुण रोकडे,डाक सेवक दिलीप उनवणे व नवनाथ लंके यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा पोस्ट खाते, निघोज ग्रामस्थ,मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रवर अधीक्षक डाकघर जे. टी. भोसले, सहाय्यक अधीक्षक डाकघर अहमदनगर संदीप घोडके,संदीप हदगल अधिक्षक डाकघर सबपोस्टमास्तर केडगाव, संतोष यादव आदिंनी प्रयत्न केले. दिपक साबळे अमोल गायकवाड लक्ष्मण ढवळे केतन चव्हाण यांनी यावेळी त्यांच्या स्वागतासाठी परिश्रम घेतले.
Post a Comment