सुनावर केली सासरच्या मंडळींनी करणी...


राहुरी : अंश्रध्देतून छळ करून मांत्रिकाच्या मदतीने जादू तिच्यावर जादूटोना करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी डॉक्टरसह त्याच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तू अपशकूनी व पांढऱ्या पायाची असल्यामुळे सासू मयत झाली असा आरोप करून नव विवाहित तरूणीचा छळ करण्यात आला. तसेच ती घरातून निघून जाण्यासाठी तिच्यावर काळा जादूटोना करण्यात आला. या घटनेबाबत श्रीरामपुर येथील एका डाॅ. व मांत्रिकासह एकूण सहा जणांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जादूटोना संदर्भात राहुरी पोलिस ठाण्यात हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. 

अश्विनी विकास लवांडे या तरूणीचा विवाह १२ फेब्रुवारी २०२० रोजी  डाॅ. विकास विश्वनाथ लवांडे (रा. कारेगाव ता. श्रीरामपूर याच्या बरोबर झाला होता. अश्विनी लवांडे ही श्रीरामपूर येथील कारेगाव येथे तिच्या सासरी नांदत असताना तिची सासू ब्रेन ॲट्याक ने मयत झाली होती. त्यानंतर सासरच्या लोकांनी अश्विनी लवांडे हिला तू अपशकूनी व पांढऱ्या पायाची आहे. 

तू येथे नांदायला आल्यामुळेच तुझी सासू मयत झाली. असे आरोप करून तिचा छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान तिच्या सासरच्या लोकांनी एका मांत्रिकाला बोलावून  अश्विनी हिच्यावर काळा जादूटोन्या सारखा प्रकार सुरू केला. तिच्या डोक्यावर लिंबू कापून, डोक्याचे केस उपटून, अंगावरील कपडे कापून ते काळ्या बाहूलीला चिटकवणे असे प्रकार तिच्यावर करण्यात आले. 

हे उपचार करून घेतले नाही, तर घरात वाईट प्रकार घडत राहतील, अशी सासरच्या लोकांनी  अश्विनी हिला धमकी दिली. १६ जूनला अश्विनी हिच्या वडिलांनी अश्विनीकडे काळी बाहुली, लिंबू व तावीत अशा वस्तू पाहिल्यावर हा काय प्रकार आहे, असे तिला विचारले. त्यानंतर तिने सर्व प्रकार वडिलांना सांगितला. हा सर्व प्रकार त्यांनी तात्काळ महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती अहमदनगरचे राहुरी येथे राहत असलेल्या पदाधिकार्यांना सांगितला. त्यानंतर राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

अश्विनी लवांडे हिच्या फिर्यादीवरून पोलिसांत पती डाॅ. विकास विश्वनाथ लवांडे,  सासरा विश्वनाथ रखमाजी लवांडे, नणंद पुनम विश्वनाथ लवांडे (तिघे रा. कारेगाव), मामा सासरा किशोर सीताराम दौड, मामी सासू प्रमिला किशोर दौड (दोघे रा. मातापुर ता. श्रीरामपूर) जादूटोना करणारा एक मांत्रीक अशा सहा जणांवर अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post