शिक्षक परिषदेचा एक झाड आठवणीचे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद....


पारनेर : सर्वांना वृक्ष वाटप केले जात आहे हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादनपारनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी केले.

एक झाड आठवणीचे या उपक्रमाचा शुभारंभ रविवारी पाडळी तर्फे कान्हूर येथे झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे होते. 

कोरोना संसर्ग कालावधीमध्ये पारनेर तालुक्यातील भाऊसाहेब सिनारे,  संजय मगर, नंदादेवी वाळुंज या प्राथमिक शिक्षकांचे निधन झाले. 

या प्राथमिक शिक्षकांची आठवण म्हणून पारनेर तालुका प्राथमिक शिक्षक परिषद संघटनेमार्फत भाऊसाहेब सिनारे यांचे गाव पाडळी तर्फे कान्हूर येथे आज (रविवार) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 5 आम्रवृक्ष, व एक वटवृक्ष लावून व रोपांसाठी जाळ्या बनवून दिल्या. 

यावेळी उपस्थित शिक्षकांना एक आमवृक्ष, एक पेरू व एक निंबोणीचे रोप भेट स्वरूप देण्यात आले. दिवंगत शिक्षक बांधवांच्या स्मरणार्थ आयोजित उपक्रमात तालुकास्तरीय वृक्षारोपनास प्राधान्य दिल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी समाधान व्यक्त केल्या. तालुक्यातील सर्व शिक्षकांना वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.  

स्वर्गीय भाऊसाहेब सिनारे यांच्या श्रध्दांजली सभेमध्ये शिक्षक परिषदेचे राज्य संपर्कप्रमुख  रावसाहेब रोहोकले, जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, शिक्षक परिषदेचे नेते संतोष खामकर, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक धोंडीभाऊ सुंबे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश दावभट श्रध्दांजली वाहत असताना उपास्थितांना अश्रू आवरता आले नाहीत.

लवकरच कोरोनाचे सर्व नियम पाळून पारनेर तालुक्यातील सर्व शिक्षकांना व्यक्तीगत संपर्क करून एक आम वृक्ष, एक पेरू तसेच एक लिंबोनीचे झाड वाटप केले जाणार आहे. जेणेकरून हे प्राथमिक शिक्षक आपल्या शाळेमध्ये या वृक्षांचे रोपण करून कोरोना संसर्गामुळे मृत पावलेल्या बांधवांच्या आठवणी वृक्षारोपणाच्या माध्यमातून जिवंत ठेवतील. 

एक झाड आठवणीचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष संदिप सुंबे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक परिषदेचे नेते संतोष खामकर, पारनेर तालुका शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सुनील दुधाडे, सरचिटणीस शिवाजी कोरडे, गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बाबा धरम, कार्याध्यक्ष दत्तात्रय गवळी, सरचिटणीस अशोक गाडगे, महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती झावरे, कार्याध्यक्षा छाया रोहोकले यांनी परीश्रम केले. 

यावेळी पाडळी तर्फे कान्हूरचे उपसरपंच अश्विनी नितीन दावभट, विठ्ठल काळे यांसह काही ग्रामस्थ उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post