नेवासा : पानेगाव (ता.नेवासा) येथीेल शिक्षकाच्या घरी भरदिवसा घरफोडी झाली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पानेगाव शिरेगाव जंगले वस्तीवरील शिक्षक दांपत्य शिवाजी राजाराम जंगले हे एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
घरात उचकापाचक करून सोन्याचे दागिने व रोख पंधरा हजार रुपये असा मुद्देमाल चोरून नेला.
या घटनेची माहिती सोनई पोलिसांना होताच त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पहाणी केली. त्यानंतर घटनास्थळावर ठसे तज्ञांना बोलवून तपास केला.
याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
भरदिवसा दरवाजा तोडून भरदिवसा घरफोडी झाल्याने पानेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
सोनई परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी दहशत निर्माण केलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी या घरफोडीचा तातडीने तपास करावा, अशी मागणी होत आहे.
Post a Comment