पाथर्डीत शिवसैनिकांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप


पाथर्डी : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तालुका शिवसेनेच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांना बिस्किटे, फळे, शुध्द पाणी बाटली बॉक्स व सकस आहाराचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे संघटक भगवान दराडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अंकुश चितळे, शहर प्रमुख सागर राठोड, दादासाहेब  फुंदे, स्वप्निल व्यवहारे, सिद्धार्थ गायकवाड, प्रितम व्यवहारे व उपजिल्हा रुग्णालयातील डॉ नवनाथ आव्हाड उपस्थित होते.

यावेळी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे संघटक भगवान दराडे म्हणाले, शिवसेना पक्ष तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्ताला न्याय देण्याचे काम करत आहे. 

स्व. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील अनेक कार्यकर्ते तयार होऊन मोठे नेते झाले आहेत. हे संपूर्ण राज्याला माहित आहे.शिवसेना पक्ष हा प्रामाणिक कार्यकर्ता घडवत आला आहे. 

राजकारणा पेक्षाही सामाजिक कार्याला मोठा वाव पक्षातील नेते मंडळी व पक्ष नेतृत्व देत आहे. राजकारण जय पराजय असो शिवसैनिकाने पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य सुरूच ठेवले.

सर्व प्रकारची क्षमता, समाजमनाचे भान, सर्व जाती-धर्मांना सोबत घेणारे कार्यकर्ते दिलेली जबादारी पाळणारे खरे शिवसेनेचेचे  शिवसैनिक आहेत.गेली ५५ वर्ष शिवसेना अविरत पने समाजासाठी काम करत आली आहे. 

आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे विराजमान आहेत याचा आजच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी मनस्वी आनंद होत आहे, असे ही दराडे म्हणाले. 

शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अंकुश चितळे यांनी आलेल्या मान्यवर व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post