शेषराव आव्हाड यांच्यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा उजळली...


पाथर्डी :  सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेषराव आव्हाड यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पोलीस खात्यात सेवा केली. पोलिस दलाची प्रतिमा उजळेल असे त्यांनी काम केले. त्यांच्या प्रामाणिक कामाचा मला अभिमान व आदर आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी केले. 

पाथर्डी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव आव्हाड हे पोलिस खात्यातील ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. 

पाथर्डी पोलिस ठाण्यातील कर्मचारी व शहरातील स्नेहबंधन ग्रुपतर्फे पाथर्डी पोलिस ठाण्यात छोटेखानी निरोप समारंभ झाला. आव्हाड परिवाराकडून पोलिस कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे होते. 

यावेळी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, परमेश्वर जावळे, नगराध्यक्ष मृत्यूनंजय गर्जे, निमा संघटनेचे सचिव डॉ. सुहास उरणकर, बाबासाहेब गर्जे, हरिहर गर्जे, संदिप शेवाळे, दीपक बडे, नीलेश क्षीरसागर, भैय्या गायकवाड, अय्युब सय्यद, किसान आव्हाड, प्रकाश बोरुडे, सुशील बाहेती, श्रीकांत काळोखे, सुभाष खेडकर, नागेश चव्हाण, डॉ. भाबड आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले की, वरिष्ठ म्हणून पोलिस कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे येत असतात. आव्हाड कोठडीत आरोपींना सवलत देत नाहीत. अशा तक्रारी माझ्याकडे असायच्या. एखाद्या कर्मचाऱ्या विषयी अशा तक्रारी येणे पोलिस खात्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 

पोलिस खात्यात आदर्शवत नोकरी करत त्यांनी सुसंस्कृत कुटुंब घडवले. पोलिस खात्यातील नोकरीत स्वतः पेक्षा नागरिकांच्या भावनांचा व सुख दुःखांचा विचार करावा लागतो. रात्री-अपरात्री उपाशीपोटी काम करावे लागते. 

चोरी झाली तेथे सांत्वन, दुःखाच्या प्रसंगात आधार, तर अपघातात व काही घटनांमध्ये नातेवाईक जवळ येत नसले तरी  मृतदेह उचलावे लागतात.

अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. पोलीस खात्यात काम करताना अनेक चांगले वाईट अनुभव येतात. या सर्व गोष्टींना आव्हाड यांनी खंबीर तोंड देत सेवा पूर्ण केली. अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांची खात्याला नेहमीच उणीव जाणवेल, असे ते म्हणाले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एकनाथ ढोले यांनी केले. बंडू गाडेकर यांनी सूत्रसंचालन तर सुरज आव्हाड यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post