शिरुर : जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील टाकळीहाजी येथील कोविड सेंटरमध्ये आज (रविवारी) मलठण येथील कैलास महाराज थोरात यांचे प्रवचन झाले.
गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील व शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली टाकळीहाजी येथे कोविड सेंटर सुरु आहे.
या कोविड सेंटरमधून दीड महिन्यांपासून शेकडो रुण्गांनी या ठिकाणी उपचार घेऊन घरी गेले आहेत.
घोडगगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे व शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांच्या उत्कृष्ट नियोजनाने कोविड रूण्गांना या ठिकाणी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होत आहे.
एक उत्कृष्ट प्रवचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत परमेश्वर सेवेचा रुण्गांना लाभ मिळवून दिल्याबद्दल थोरात महाराज यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रवचनाचे कोविड सेंटर मंत्रमुग्ध झाले होते.
या कोविड सेंटरमधून रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाल्याने रुग्ण समाधानी आहेत.
Post a Comment