सहा दरोडेखोरांना पाठलाग करुन पकडले... ग्रामसुरक्षा दल अन् पोलिसांची कामगिरी...


नेवासा : ग्रामसुरक्षादलाचे युवक व सोनई पोलिसांनी मोरेचिंचोरे येथील शेतात पाठलाग करुन सहा दरोडेखोरांना पकडले आहे. 

गेल्या सोनईत आठ दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यानंतर गावातील  एकशे तीस युवकांचे ग्रामसुरक्षादल स्थापन करण्यात आले. सोबतीला पोलिस पथक, मुळा एज्युकेशन व मुळा कारखान्याचे सुरक्षा कर्मचारी रात्रीची गस्त घालत होते. 

चार ते पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न झालेला असून एका युवकावर चोरट्यांनी हल्ला केला होता. आज सकाळी साडेनऊ वाजता बसस्थानक येथे एक संशयित टाटा सफारी गाडी दिसल्यानंतर युवकांनी गाडीचा पाठलाग केला. 

सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे, पोलिस पथक व ग्रामसुरक्षादलाचे शंभरहून अधिक युवक मोरेचिंचोरे येथील शेतात पोहचले. भगवान अंबादास इलग यांच्या शेडमध्ये गाडी लावून चोरटे पळाले मात्र युवक व पोलिसांनी सहा आरोपीस पाठलाग करुन पकडले आहे. 

पोलिसांनी टाटा सफारी (एम.पी.०४ सी.जी.२००७)सह आरोपी धर्मेंद्र शिवनारायण सोळंकी(वय २५), अजय दिनेश मालवीय (वय-२०), समीर नुरमहंमद खान (वय २३),

राकेश रामलाल सोळंकी (वय २२), मिथुन शिवनारायण सोळंकी (वय २०), अशोक रामचंद्र मालवीय (वय २०, सर्व रा. दुपाडा, ता. बडोदिया, जि. साजापुर, राज्य मध्यप्रदेश) यांना अटक करुन दोन चाकू, दोन कटावनी, लोखंडी गज, लाकडी दांडेसह तीन मोठे ड्रम डिझेलही जप्त केले आहे. 

सहा आरोपी पकडण्यासाठी गावातील विविध मंडळाच्या युवकांनी चोख भुमिका बजावली. ग्रामसुरक्षादलातील युवकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. डिझेल चोरी रॅकेटसह अन्य गुन्ह्याचा तपास घेतला जात आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post