पाथर्डी : कोरोनाच्या दुस-या लाटेच्या अखेरच्या टप्यात महसूल, पोलिस, नगरपालिका, पंचायत समिती व आरोग्य विभाग यांनी अतिशय चांगले काम केले आहे. म्युकरमायकोसीस रोगाने नागरीकांमधे भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोवीडच्या तिस-या लाटेला समोरे जाण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे अशा सूचना आमदार मोनिका राजळे यांनी दिल्या आहेत.
आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात कोरोनाबाबत आढावा बैठक सोमवारी घेण्यात आली. प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ .अशोक कराळे, डॉ.भगवान दराडे, गटविकास अधिकारी शितल खिंडे, पंकज नेवसे,नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे,उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, सोमनाथ खेडकर, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर उपस्थीत होते.यावेळी तालुक्यातील कोरोना स्थितीबाबतची आकडेवारी तहसीलदार शाम वाडकर यांनी बैठकीत मांडली.
येणार्या काळात लाटेला सामोरे जाताना योग्य ती पूर्व तयारी करावी अशा सूचना आमदार राजळे यांनी यावेळी दिल्या. तालुक्यातील म्युकरमायकोसीस आजाराचा पहिला बळी नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना गेला आहे.
कोल्हार गावातील एका माजी सैनिकाचा मृत्यु तीन दिवसापूर्वी या आजारामुळे झाला आहे. तालुक्यात आणखी तीन रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
नागरिकांनी कोरोनासोबतच म्युकरमायकोसीस आजाराची काळजी घेण्याचे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे यांनी केले आहे.
शहरातील वंसतराव नाईक चौक ते उपजिल्हा रुग्णालय रस्त्यावरील फळांचे गाडे व इतर व्यावसायीकांना हटविण्यासाठी महसूल, पोलिस व पालिका प्रशसानाने संयुक्तपणे मोहिम राबविणार आहे. यासाठी व्यावसायिकांना सुरुवातीला समज देण्यात येईल. त्यानंतर कारवाई केली जाणार आहे. रस्त्यावर कोणीही बसणार नाही यासाठी स्वतंत्र पथके नेमुण कारवाई करण्यात येणार आहे.
Post a Comment