नगर : शगहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात निलंबित पोलिस निरीक्षक विकास वाघ याला नाशिक येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
कोतवाली पोलिस ठाण्याचा तात्कालिक पोलिस निरीक्षक विकास वाघ वादग्रस्त ठरल्यानंतर त्याची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली होती. त्याच्या विरोधात एका महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर वाघ विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान सदर महिलेने तोफखाना पोलिस ठाण्यात दुसरा अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पसार असेला वाघ याला अटक करण्यात आली आहे.
Post a Comment