नगर : जिल्ह्यात बाधिताचा आकडा कमी झाला आहे. तीन महिन्यातील सर्वात कमी आकडा काल (शनिवारी) आला होता. यैमुळे सर्वांना दिलासा मिळाला होता. परंतु कालपेक्षा आज बाधिताचा आकडा 285ने वाढला आहे. राहात्यात सर्वाधिक बाधित वाढले आहे.
जिल्ह्यात आज रविवारी 594 बाधित आढळून आलेले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या चाचणी अहवालात 72, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 354, तर अँटीजेन चाचणीत 168 असे एकूण 594 कोरोना बाधित आढळून आले.
राहात्याने जिल्ह्यात आघाडी घेतली. राहात्यामध्ये 207 जण बाधित आढळून आलेले आहेत. संगमनेरमध्ये 54, पाथर्डीमध्ये 44 तर नगर शहरात अवघे दहा बाधित आढळले आहेत.
शनिवारच्या तुलनेत रविवारी रुग्णांची संख्या वाढली आहे. शनिवारी 308 व रविवारी 594 बाधित आढळले आहेत.
Post a Comment