कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा कांद्याच्या भावावर परिणाम...


राहाता : येथील बाजार समितीत सोमवारी  कांद्याची 14 हजार 842 गोण्यांची आवक झाली. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक केल्याने त्याचा परिणाम कांद्यावर झाला.

राहाता बाजार समितीत 14 हजार 842 कांदा गोण्यांची आवक झाली. सोमवारी एक नंबर कांद्याला 2200 रुपये भाव प्रतिक्विंटल मिळाला. 

कांद्याचे प्रतवारीनुसार बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये : एक नंबर कांद्याला 1600  ते 2200, दोन नंबर कांद्याला 1050 ते 1550,  तीन नंबर कांद्याला 500 ते  1000, गोल्टी कांद्याला 1300 ते 1600, जोड कांद्याला 100  ते 500.

शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन राहाता बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

राहाता बाजार समितीत डाळिंबाची 15 हजार 120 क्रेटसची आवक झाली. यामध्ये डाळिंबाला सर्वाधिक 125 रुपये किलोचा भाव मिळाला.

बाजार समितीचे किलोमध्ये डाळिंबाचे भाव : एक नंबर डाळिंब : 96 ते 125, दोन नंबर डाळिंब : 66 ते 95, तीन नंबर डाळिंब : 31 ते 65, चार नंबर डाळिंब : अडीच रुपये ते 30 रुपये किलो दराने विक्री झाली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळे व्यापार्यांची संख्या कमी झालेली आहे. त्याच बरोबर हॉटेल व उपहारगृह चालकांची मागणी कमी झालेली आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post