राहाता ः काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध लादलेले आहे. या निर्बंधाचा फटका आता कांद्याला बसला आहे. कांद्याला मागणी कमी झालेली असून आवक वाढल्याने कांद्याच्या भावात चढ उतार सुरु आहे.
राहाता
बाजार समितीमध्ये 12 हजार 993 कांदा गाेण्यांची आवक झाली. यामध्ये एक
नंबर कांद्याला 2200 पर्यंत भाव मिळाला. मागील लिलावाच्यातुलनेत कांद्याच्या भावात घसरण झालेली आहे.
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांद्याला 1600 ते 2200, दाेन नंबर
कांद्याला 1050 ते 1550, तीन नंबर कांद्याला 500 ते 1000, गाेल्टी कांद्याला 120 ते 1500 व जाेड कांद्याला 100 ते 500
चा भाव प्रतिक्विंटल मिळाला.
शेतकर्यांना कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करूनच विक्रीस आणावा, असे अावाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
डाळिंबाचीही राहाता बाजार समितीत चांगली आवक झाली. राहात्यात आज (बुधवारी) 18 हजार 950 क्रेटस डाळिंबाची आवक झाली. यामध्ये एक नंबर डाळिंबाला 86 ते 110, दोन नंबर डाळिंबाला 55 ते 85, तीन नंबर डाळिंबाला 26 ते 55, चार नंबर डाळिंबाला अडीच रुपये ते 25 रुपयांपर्यंतचा भाव मिळाला.
Post a Comment