पारनेर : सततचा पाचवीला पुजलेला दुष्काळी तालुका अशीच पारनेर तालुक्याची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे. शेतीचे तर सोडाच पण पिण्याच्या पाण्याची देखील दुर्भिक्ष्य या तालुक्याला सतत भासत आहे. अनेक पाणी परिषदा झाल्या, आश्वासनांच्या फैरी झडल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पारनेरकरांच्या नशिबी पाण्यासाठीची भटकंती कायमच राहिली मात्र, याला अपवाद ठरले ते आमदार निलेश लंके! त्यांच्या कारकीर्दीला अद्याप दोन वर्षेही पूर्ण होत नाही तोच पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
सतत
अवर्षणप्रवण तालुका असणारा पारनेर तालुका कुकडी लाभक्षेत्राखालील बोटावर
मोजण्याएवढे गावे वगळता केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असतो. शेती
असूनही शाश्वत पाणी नसल्याने अनेकांनी रोजगारासाठी मुंबई व इतर शहरांची वाट
धरली आहे.
हा विषय झाला शेतीच्या पाण्याचा मात्र, पिण्याच्या पाण्याचे
दुर्भिक्ष्यही तालुक्याला सततच जाणवत आहे.सर्वाधिक पाझर तलावांची संख्या
असणाऱ्या या तालुक्यात उन्हाळ्यात टँकरची संख्याही सर्वाधिकच आहे.
पिण्यासाठीचे आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्याचे ठिकाण असणार्या
पारनेर शहराचाही म्हणावा तसा विकास झाला नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
पारनेर
तालुक्याच्या पाणीप्रश्नासाठी अनेक बैठका आणि पाणी परिषदा झाल्या,
आश्वासनांची खैरात झाली.पदरी मात्र निराशाच पडली पण सध्यातरी तालुक्याच्या
दृष्टीने आशेचा एक किरण निर्माण झाला आहे आणि तो म्हणजेच आमदार निलेश लंके
यांच्या रूपाने !
आमदार
लंके यांनी गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटात केलेल्या कामांमुळे
त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या 'पवार फॅमिली' बरोबरच राज्य मंत्रिमंडळातील
मंत्री गणही फिदा आहेत. त्यामुळेच त्यांच्या शब्दाला वजन निर्माण झाले आहे
याचा प्रत्यय त्यांच्या कामाच्या रोजच्या मंजुरीच्या आकडेवारीतून दिसून
येतोय.
सध्या कोरोनाच्या संकटामुळे विकासकामांच्या निधीला कात्री लागली
असतानाही आमदार लंके यांच्या मंजूर निधीचा दररोजचाच आकडा काही कोटीचा असतो.
त्यांच्या कामावर मतदार संघातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे,पद्मश्री
पोपटराव पवार देखील खुश आहेत.
विधानसभा
निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार
यांच्या उपस्थितीत पारनेरच्या बाजारतळावर झालेल्या प्रचारसभेत या
तालुक्यात पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन निलेश लंके दिले होते.आणि
आता त्याचाच प्रत्येय पदोपदी येत आहे.
पारनेर शहराच्या पाणी प्रश्नासाठी
आमदार लंके यांच्या पाठपुराव्यामुळे वावरथ जांभळी येथील जलाशयावरून
पाणीपुरवठा योजनेचे सर्वेक्षण झाले आहे. अनेक वर्षे रखडलेली साखळाई पाणी
योजना, राळेगणसिद्धी परिसरातील गावाची पाणीयोजना, वडझिऱ्यातील शिवडोह येथील
बंदिस्त पाईपलाईन यासह तालुक्यातील विविध गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी
अनेक योजनांना तत्त्वतः मान्यता मिळाली असून अनेक योजनांसाठी पाठपुरावा
सुरूच आहे. या सर्व योजना मार्गी लावण्याचा चंगच आमदार लंके यांनी बांधला
आहे.
कान्हूर पठार व
परिसरातील पठारी भागाला शेतीसाठी एक टीएमसी पाणी मिळावे यासाठी आमदार लंके
यांचा पाठपुरावा सुरूच आहे.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जलस्त्रोत
उपलब्ध झाल्यास निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे आश्वासन आमदार लंके
यांना दिले आहे.
जामगावसह सारोळा अडवाई, भांडगाव,वडगाव आमली, दैठणे
गुंजाळ,काळकुप या गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आमदार लंके यांनी
पाठपुरावा केल्याने कालच तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे
वर्षानुवर्षाचा या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
जामगावसह
सहा गावांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी आ.लंके यांनी भरीव निधी
मंजूर केल्याबद्दल सारोळा अडवाईचे सरपंच परशुराम फंड, दैठणे गुंजाळचे सरपंच
पैलवान बंटी गुंजाळ,वडगाव आमलीचे सरपंच अमोल पवार, जामगावच्या सरपंच
अरुणाताई खाडे,काळकुपच्या सरपंच ताराबाई कदम,भांडगावच्या सरपंच उज्जवला
खरमाळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने आ.लंके यांचे आभार मानले आहेत.
Post a Comment