अमर छत्तीसे
श्रीगोंदा ः तालुक्यातील वांगदरी येथील रेशन दुकान सेवा सोसायटीच्या वतीने चालवण्यात
येते. पण या रेशनदुकाना बाबतीत अनेक तक्रारी होत्या. या बाबतीत आपण जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे
तक्रार केली होती. त्यानुसार चाैकशी हाेणार आहे, अशी माहिती भाजपचे
तालुका अध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिली.
नागवडे म्हणाले की, वांगदरी सेवा
सोसायटीच्या रेशन दुकानात सर्व सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचा
गहू, तांदूळ दिला जात नाही. जादा दराने विक्री केली जाते. लाभार्थांचे ठसे
घेऊन कमी धान्य वाटप केले जात असल्याची तक्रार आपण जिल्हा पुरवठा
अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार
आज तहसीलदार प्रदिप कुमार पवार यांनी या स्वस्त धान्य दुकानाची तात्काळ
चौकशी करण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती नागवडे यांनी दिली.
गरिबांच्या तोंडचा घास काढून घेणार्यावर कारवाई व्हावी ः नागवडे
या
स्वस्त धान्य दुकानातून गोरगरीब जनतेला शासनाच्या नियमानुसार धान्य वाटप
केले जात नाही जादा दराने विक्री केली जाते अशा प्रवॄतीवर कारवाई झालीच
पाहिजे, अशी प्रतिक्रिया संदीप नागवडे यांनी दिली.
Post a Comment