राहुरी ः देशी
गाईंचे व्यवस्थापन करताना देशी गायीचे महत्व समजून घेणे महत्त्वाचे आहे.
सध्या अनेक गोपालक देशी गाई पालनकडे वळताना दिसत आहे. कारण देशी गाईची
रोगप्रतिकार क्षमता, उत्तम असून दुधाची गुणवत्ता ही अतिशय चांगली असते तसेच
देशी गाईच्या दुधाची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे
संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी केले.
महात्मा
फुले कृषी विद्यापीठांतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पुणे व
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ऑनलाइन देशी गोपालन प्रशिक्षण
कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
याप्रसंगी पुणे कृषि महाविद्यालयाचे
सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग
प्रमुख डॉ. दिनकर कांबळे, डॉ. शिवाजी पाचपुते, डॉ. संजय मंडकमाले,
प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, डॉ. रामदास शेंडे उपस्थित
होते.
डॉ.
सुनील जाधव यांनी देशी गाईंचे पोषण व आहार, डॉ. सुनील अडांगळे यांनी
वर्षभरासाठी हिरवा चारा नियोजन, डॉ. शांताराम गायकवाड यांनी तनावमुक्त देशी
गोपालन, डॉ. दिगंबर मोकाट यांनी देशी गाईंच्या आहारात औषधी वनस्पतींचा
वापर, डॉ. मनोज आवारी यांनी समतोल आहार व घरगुती खाद्य निर्मिती व डॉ.
रोमा यांनी देशी गोपालनमध्ये होमिओपॅथी औषधांचा वापर या विषयावर
गोपालकांना मार्गदर्शन केले.
डॉ. धीरज कंखरे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.
सुनील अडांगळे यांनी आभार मानले.
Post a Comment