नगर : जिल्ह्यात बाधिताचा आकडा कमी व जास्त होत आहे. शनिवारी बाधितांचा आकडा वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही वाढ सुरु आहे. पारनेरमधील चिंता वाढत चालली आहे.
जिल्ह्यात बाधितांचा आकडा 590 आहे. जिल्हा रुग्णालयाच्या चाचणी अहवालात 35, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 192 तर अँटीजेन चाचणीत 363 असे एकूण 590 कोरोना बाधित आढळून आले.
पारनेर तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली. पारनेरमध्ये 111 जण बाधित आढळून आलेले आहेत. संगमनेर तालुका सध्या जिल्ह्यात दोन नंबरला आहे. संगमनेरमध्ये 99 बाधित आढळून आलेले आहेत.
कर्जत तालुका तिसर्यास्थानी आला आहे. कर्जतमध्ये आज दिवसभरात 62 बाधित आढळले आहेत. नगर शहरात दिवसभरात 28 बाधित आढळून आलेले आहेत.
पारनेर तालुक्यात सध्या बाधितांचा आकडा वाढत असल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे.
Post a Comment