शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्य छिंदमविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी


नगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेली माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास गृहविभागाने परवानगी दिली आहे. 

शासकीय पदावर असल्या कारणाने भादंवि कलम १ ९ ६ (१) अ प्रमाणे तोफखाना पोलिसांनी गृहविभागाकडे दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मागितली होती. गृहविभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी यासाठी परवानगी दिली आहे.  

येत्या दोन दिवसात छिंदम विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण सुरसे करीत आहे. 

फेब्रुवारी २०१८ मध्ये छिंदम याने मनपाच्या एका कर्मचाऱ्यास फोनवरून वाद घातला होता. तसेच छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याची ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. 

आता या गुन्ह्याचे दोषारोपपत्र पोलिसांकडून न्यायालयात दाखल केले जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post