श्रीगोंदा : श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार यांच्या भ़कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष टिळक भोस यांच्या नेतृत्वाखाली आज उपोषण करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदिप पवार हे हजर झाल्यापासून नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात. त्यांनी पकडलेला वाळुचा ट्रक सोडून देणे, रस्ता वहिवाट केसमध्ये बेकायदेशीर कामकाज करणे, साखर कारखान्याच्या आरआरसी बाबत कसूर करणे, तहसील कार्यालयासमोरील अतिक्रमण काढण्यास कसूर करणे आदी तक्रारी बाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष टिळक भोस, अँड. समित बोरुडे, वैभव घोडेकर हे नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर आज उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती भोस यांनी दिली.
Post a Comment