श्रीगोंदा : कोरोना प्रतिबंधक लस आता गावोगावी उपलब्ध होऊ लागली. यात महत्त्वाचा वाटा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांचा आहे.
तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष गोवर्धन नवले व विश्वनाथ इथापे यांनी जिल्हा परिषद सदस्य पंचशिलाताई गिरमकर यांच्याकडे केली होती.
या मागणीची तात्काळ दखल घेत गिरमकर यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांना लसीकरण करण्याबाबत सूचना केल्या.
डॉ. खामकर यांनी ही आज आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शेळके यांना टाकळी कडेवळीत येथे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार डॉ. शेळके यांनी टाकळी कडेवळीत येथील 220व्यक्तींचे लसीकरण केले आहे.
या लसीकरणाचे चांगले नियोजन केल्यामुळे नागरिकांचे लसीकरण झाले.
Post a Comment