नगर : अनोळखी इसमाने पाणी प्यायला मागवून महिलेची सोन्याची चेन हिसकावून नेली . ही घटना दि . १६ रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता सिंधी कॉलनीत घडली.
या प्रकरणी सारा देवदान वंजारे (रा . सिंधी कॉलनी , नगर ) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वंजारे या घरासमोर असताना एक अनोळखी इसम त्यांच्या घरासमोर आला. त्यांना प्यायला पाणी द्या , असे म्हणून त्याने त्यांच्या गळ्यातील पंधरा हजार रूपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून पोबारा केला.
सारा वंजारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पिंगळे करीत आहेत.
Post a Comment