मारुती कारच्या धडकेत पती ठार पत्नी जखमी


नगर : वेगातील मारुती ओमिनी कारने रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन मोटार सायकलला पाठीमागून जोरात धडक दिली. 

या अपघातात दुचाकी वरील पती ठार झाला तर पत्नी जखमी झाली. त्यांच्या मोटार सायकलचेही मोठे नुकसान झाले. 

ही घटना निंबळक बायपास रस्त्यावर साईबनकडे जाणाऱ्या कच्चा रस्ता समोर घडली.    

याबाबतची अधिक माहिती अशी की नागेश विश्वंभर कदम (वय 40 रा. गिरणा साखर कारखाना दाभाडी, श्रीरामनगर, ता. मालेगाव, जि. नाशिक) हे त्यांची पत्नी सविता (वय 39) यांच्यासह दुचाकीने निंबळक बायपास रस्त्याने साईबनकडे जात होते. 

यावेळी भरधाव वेगात आलेल्या मारुती ओमिनी कारने (क्रमांक एमएच 15 ईबी 1396) पुढे चाललेल्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. 

या धडकेत नागेश कदम हे ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाली. 

या धडकेत मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले. अपघात होताच मारुती कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. 

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post