नगर : रस्त्याने पायी जाणाऱ्या 63 वर्षीय वृद्ध पादचाऱ्यास भरधाव वेगातील मोटारसायकलने धडक दिली या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
या अपघाकात दुचाकीवरील एक गंभीर जखमी झाला. ही घटना नगर औरंगाबाद रोड वरील धनगरवाडी शिवारातील होटेल स्वागत जवळ घडली.
याबाबतच्या अधिक माहिती अशी की भगवान मल्हारी नजन (रा. बहिरवाडी तालुका नगर) हे नगर औरंगाबाद रस्त्यावरील धनगरवाडी शिवारातून हाँटेल स्वागतकडे पायी जात असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकी (क्रमांक एम एच 17 सी 4676) ने भगवान नजन यांना जोरात धडक दिली.
या धडकेत नजन यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील दीपक राशिनकर हा गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सुभाष महाजन यांच्या फिर्यादीवरून मोटार सायकलस्वार नवनाथ श्रीधर वाघ (रा. वांजोळी लोहगाव, ता. नेवासा) याच्याविरुद्ध अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
रस्त्याने वाहने चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होत आहे. वाहन वेगात असल्याने हा अपघात झाला आहे.
Post a Comment