नगर : तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी विजय पठारे याच्यासह सहा जणांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
विजय राजू पठारे (वय 40, रा. सिध्दार्थ नगर, ता. जि. नगर) अजय राजू पठारे (वय 25, रा. सिध्दार्थनगर, ता. जि. नगर) , बंडू ऊर्फ सुरज साहेबराव साठे (वय 22, रा. सिध्दार्थनगर, ता. जि. नगर), अनिकेत विजू कुचेकर (वय 22 , रा. सिध्दार्थनगर, ता. जि. नगर) , प्रशांत ऊर्फ मयूर राजू चावरे (वय 24, रा. सिध्दार्थनगर, ता. जि. नगर), अक्षय गोविंद शिरसाठ (वय 23, रा. सिध्दार्थनगर, ता. जि. नगर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या आरोपीवर मोक्काची कारवाई करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने धडक कारवाई मोहीम हाती घेतलेली आहे. येथील जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ज्या आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत.
ज्या टोळ्या गुन्हे करत आहेत. अशांचा अहवाल तयार करून संबंधित पोलिस ठाण्याला पुढील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
मागील आठवड्यामध्ये अशा प्रकारची एका टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. त्यामध्ये 9 आरोपींचा समावेश होता.
या वर्षभरामध्ये पाच टोळ्या वर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होत आहे.
Post a Comment