नगर : उपकेंद्र करंजी (ता.पाथर्डी, जि. नगर) येथे कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शेळके यांनी प्रशासनाच्या हेतुपुरस्सर जाणून बुजून दिल्या जाणार्या त्रासाला कंटाळून कर्तव्यावर असताना आत्महत्या केली. डॉ. शेळके यांच्या मृत्यूस जबाबदार धिकार्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेतर्फे निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. शेळके यांनी सुसाइड नोटवरुन असे निदर्शनात येते की, वरिष्ठ अधिकारी हे जाणून बुजून त्यांना लक्ष करत असत. त्यांच्यावर हेतूपुरस्सर अतिरिक्त कामाचे लक्ष देऊन त्यांना सतत तसणावामध्ये राहण्यास परावृत्त करत असत.
अशा प्रकारचे खंत त्यांनी वारंवार त्यांच्या सोबतीत असलेल्या सहकार्यास देखील व्यक्त केली. तसेच संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सुध्दा निदर्शनात आणून दिली. परंतु त्यामध्ये सुधारणा करण्याऐवजी त्यांना लक्ष करुन मानसिक दृष्टया तणावामध्ये राहण्यास परावृत्त केले.
तसेच त्यांचे गेल्या तीन महिन्यांचे मानधन देखील देण्यात आले नाही. त्याचीच पार्श्वभूमी म्हणून डॉ. शेळके यांनी सहा जुलैला दुपारी एकच्या सुमारास आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी स्वतःचे आयुष्य संपवले.
दरम्यान, जीवन धोक्यात घालून आपले काम चोख पार पाडत असताना सदर कर्मचार्यांस व्ययक्तिकरित्या असे लक्ष करुन त्यांचा जीवन जाण्यास परावृत्त करत असलेचे स्पष्ट आहे.
म्हणून संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. शैलेश पवार, डॉ. संदीप गायकवाड, डॉ.अयज पठारे, डॉ. जयदीप काळे, संकेत कोकाटे आदींनी केली आहे.
Post a Comment